सुधाताई सदाशिव पाटील कन्या प्रशाला व ज्युनि. कॉलेजची सुरवात १९७५ मध्ये करण्यात आली असून आज विद्यालयामध्ये ११०० विद्यार्थींनी शिक्षण घेत आहेत. आमच्या शाळा पद्धतीने चालणाऱ्या कन्या प्रशाला व ज्युनि. कॉलेजचा विस्तार ५ वी ते दहावी व ११ वी , १२ वी (कला व वाणिज्य) झाला आहे. उत्तमोत्तम शिक्षणाबरोबरच इतर सुविधा ही दिल्या जातात. आमचा स्टाफ ही याला अतिशय चांगली साथ देत आहे ही गौरवाची बाब आहे. आमच्या विद्यालयाकडे सुसज्ज भव्य इमारत, प्रशस्त वर्ग खोल्या, इ-लर्निंग ची सोय, उत्कृष्ट संगणक कक्ष , त्याचबरोबर आधुनिक जगात विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी लागणाऱ्या सर्व आवश्यक गोष्टी पुरविल्या जातात. त्याचबरोबर आवश्यक असणारे प्रशस्त मैदान, त्यावरील सोयी सुविधा यांची उपलब्धता मुबलक प्रमाणात करून दिली आहे. सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे. आणि या स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी आजचा विद्यार्थी सुसंस्कारी, स्वयंपूर्ण निरोगी व सर्वगुणसंपन्न असणे आवश्यक आहे. म्हणूनच आमच्या शाळेचे सर्व कामकाज हे अत्यंत शिस्तबद्धपणे सुरु असते. आमच्या शाळेच्या विद्यार्थिनी विविध क्षेत्रामध्ये झळकताना दिसून येतात.
Copyright All rights reserved | Design by Mohitinfotech